Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
गुन्हेगारी

आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळवण्याच्या उद्देशाने’आमदार’ लोगोचा वापर!

आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळवण्याच्या उद्देशाने’आमदार’ लोगोचा वापर!

पिंपरी : कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळविण्याच्या उद्देशाने बीएमडब्ल्यू कारच्या पुढील काचेवर ‘आमदार’ विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई असा लोगो लावल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवार 13 सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

वशिम अहमद अब्दुल जलील आळंद (वय 42, रा. हडपसर) आणि हितेंद्र अशोक कवडे (रा. घोरपडी )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी परिसरात वाहतूक पोलिसांना बीएमडब्ल्यू कारच्या पुढील काचेवर मा ‘आमदार’ विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई असा लोगो लावल्याचे आढळून आले. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळवण्याच्या उद्देशाने लोगोचा वापर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

indra dairy
indra dairy

क्रेटा कारच्या काचेवर आमदार लोगो; गुन्हा दाखल!
पिंपरी : स्वतः अथवा कुटुंबातील कोणीही आमदार नसताना क्रेटा कारच्या काचेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य ‘आमदार’ असा लोगो आणि अशोक स्तंभाचे चिन्ह लावल्याप्रकरणी वाहन चालकाविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी येथील गेलाार्ड चौकात रविवार 13 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

युवराज भरत बाबर (वय 28, रा. कासरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार अरुण कोल्हे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेलाड चौकात वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी बाबर याच्या क्रेटा कारच्या काचेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य ‘आमदार’ असे लिहिलेले आणि अशोक स्तंभ असलेले चिन्ह निदर्शनास आले. चालकाने शीट बेल्टही लावलेला नव्हता. चौकशी दरम्यान व्हीआयपी सवलत आणि आर्थिक फायद्यासाठी लोगो लावल्याचे वाहन चालकाने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"