Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
गुन्हेगारी

जुन्या भांडणाच्या वादातून एका व्यक्तीवर कुकरीने वार!

जुन्या भांडणाच्या वादातून एका व्यक्तीवर कुकरीने वार!

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर धारदार कुकरीने वार करुन खाली पाडले आणि पुन्हा हातावर वार केला. ‘थांब तुला आज मी जिवंत सोडत नाही,आज मी तुला खल्लास करतो’ असे बोलून हातावर पुन्हा वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवार 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हॉटेल संजना चायनीज, सीएम गेट समोर, दापोडी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी विलास बबन हजारे (वय 55, रा. सर्वे नंबर 27, दोन/ ए, अश्विनी निवास, पवनानगर, पिंपळे गुरव, मूळ- रा. सीएमई गेट समोर, लुंकड, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वजय चिंतामण शिंदे (वय 47, रा. भोंडवे चाळ, सीएमई गेट समोर, दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी फोनवर बोलत असताना जुन्या भांडणाचे कारणावरून आरोपी अचानकपणे फिर्यादी जवळ आला व त्याने त्याचे कडे असणाऱ्या धारदार कुकरीने फिर्यादीच्या डोक्यावर जोरात वार केला. त्यामुळे फिर्यादी खाली पडला. फिर्यादीच्या जवळ जात ‘थांब तुला आज मी जिवंत सोडत नाही, आज मी तुला खल्लास करतो’ असे बोलून आरोपीने पुन्हा फिर्यादीच्या हातावर वार केला. फिर्यादीच्या जवळच उभा असलेल्या फिर्यादीचा मित्र दीपक जगन्नाथ कानडे यांनी आरोपीस अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला देखील जोराचा धक्का मारून बाजूला ढकलून दिले. फिर्यादीच्या दोन्ही हातावर परत कुकरीने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हातातील हत्यार लोकांच्या दिशेने दाखवून ‘मी इथला भाई आहे, माझे जर का कोणी नाव घेतले तर मी त्याला जिवेज मारून टाकीन’ असे म्हणून दहशत निर्माण केली. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक ताकवले हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"