राहुल चावरिया यांच्या अष्टपैलू खेळीने पीसीएमसी संघाचा दणदणीत विजय!

पिंपरी : औद्योगिक क्रिकेट T20 २०२६ स्पर्धा या बजाज ऑटो मैदान या ठिकाणी सुरू झाली आहे स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ने सहभाग घेतला असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने साखळी सामन्यामध्ये महिंद्रा CLPL यांच्या विरुद्ध ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे, सामन्यांमध्ये राहुल चावरिया यांनी अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत ४ षटकामध्ये १७ धावा देऊन २ बळी मिळवले तसेच फलंदाजीत ३६ चेंडूत ८ चौकार च्या मदतीने नाबाद ४९ धावा ची खेळी करून सामनावीर चे पारितोषक मिळवले आहे.

महिंद्रा CLPLसंघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून १९.१ षटकांमध्ये ९३ धावा मध्ये संपुर्ण टीम बाद झाली, फलंदाजीत सर्वाधिक तुषार तांबे यांनी २० धावा केले पी सी एम सी संघाकडून गोलंदाजीमध्ये विवेक मालशे यांनी अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत ४ बळी मिळवले, त्यांना राहुल चावरिया २ बळी, विपिन थोरमोटे २ बळी, महेश कुदळे १ बळी, सचिन लोणे यांनी १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने ९३ धावांचा पाठलाग करताना फक्त १३ षटकामध्ये २ गडी च्या मोबदल्यात ९६ धावा करून महिंद्रा CLPL यांचा ८ गडी राखून विजय मिळवला पी सी एम सी संघाकडून राहुल चावरिया यांनी नाबाद ४९, सचिन लोणे नाबाद २९ धावा केल्या आहे. सामन्यामध्ये राहुल चावरिया यांनी सुरेख अष्टपैलू खेळी करून सामनावीर चे पारितोषिक मिळवले.

