फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

दिव्यांग बांधवांच्या मतदान जनजागृती रॅलीतून लोकशाहीचा सशक्त संदेश!

दिव्यांग बांधवांच्या मतदान जनजागृती रॅलीतून लोकशाहीचा सशक्त संदेश!

पिंपरी : मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो… माझं मत, माझा अधिकार… मतदान हा हक्क आमचा, लोकशाहीचा अभिमान आमचा… या घोषणांच्या गजरात दिव्यांग मतदारांनी लोकशाहीच्या सशक्ततेचा संदेश देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज दिव्यांग बांधवांच्या सहभागातून भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली निगडी प्राधिकरण ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय येथून सुरू होऊन बिजलीनगर, वाल्हेकर वाडी, चापेकर चौक, चिंचवड मार्गे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पोहोचली. रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.

सदर रॅलीचा समारोप चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आला. यावेळी मतदान जनजागृतीसाठी सादर केलेल्या फ्लॅश मॉबने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच उपस्थितांना, ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,’ अशी मतदानाची शपथ देण्यात आली. या रॅलीमध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"