फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

खेळातील सहभाग आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचा : यश भोसले

खेळातील सहभाग आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचा : यश भोसले

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ व्या बॅडमिंटन स्पर्धा ; ४१ कंपन्यांच्या ३६० महिला व पुरुष खेळाडूंचा सहभाग
पिंपरी :  खेळातील सहभाग आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे.यामुळे पूर्ण कुटुंबास फायदा होतो असे मत स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अल्ट्रा कॉर्पोटकचे डायरेक्टर यश भोसले यांनी व्यक्त केले. दिनांक ३ जानेवारी रोजी, औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या बॅडमिंटन स्पर्धेस वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे येथे सुरुवात झाली. या प्रसंगी ते बोलत होते.

viara vcc
viara vcc

या स्पर्धेस अल्ट्राकॉर्पोटेक,टाटा मोटर्स,बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, मिंडा कॉर्पोरेशन,फिलिप्स, शिंडलेर्, ॲटलास कॉपको,टीई कनेक्टिव्हिटी,अटॉस,फॉर्विया,फ्लीटगार्ड फिल्टर्स,टाटा टेक्नॉलॉजी,एचडी हुंडई,इमर्सन इंडिया, टीकेआयएल, थिसेनकृप उधे,प्राज इंडस्ट्रीज,टीसीएस,एसकेएफ,थरमॅक्स,जेसीबी,दसॉल्ट सिस्टीम्स,अक्सेंचर,एनर्जी इन मोशन,एच्ए,सहाना इंजिनिअरिंग कॉग्निजंट,ऑप्टिमायझर,वोस्टलपाईन,सँडविक एशिया, टीसीएस अशा एकूण ४१ कंपन्यांच्या ३६० महिला व पुरुष खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ह्या अकॅडमी मधे एकूण १६ बॅडमिंटन कोर्ट असून ते सर्व सुविधा युक्त आहे. औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे ही स्पर्धा अल्ट्राकॉर्पोटेक यांनी आयोजित केली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन अल्ट्रा कॉर्पोटकचे डायरेक्टर यश भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व श्रीफळ वाढवून झाले. या स्पर्धेच्या सुरुवातीला, औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदिप वाघ यांनी औद्योगिक क्रीडा संघटनेची पार्श्वभूमी व माहिती खेळाडूंना सांगितली. या प्रसंगी बोलताना प्रदिप वाघ म्हणाले की औद्योगिक क्रीडा संघटना आपले कक्ष रुंदावत आहे.याचा फायदा ग्रामीण व शहरी, कामगार खेळाडूना होत आहे. नरेंद्र कदम व वसंत ठोंबरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

यावेळी अल्ट्रा कॉर्पोटकचे दीपक शेट्टी(असोसिएट डायरेक्टर),अमित काळे(डीजीएम-एच आर),धीरज अधिकारी(एचआर मॅनेजर),आशिष भोसले,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सचिव वसंत ठोंबरे, सहखजिनदार विजय हिंगे,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे, आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम, सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटीचे दुष्यंत गायकवाड, अजित कुंभार बॅडमिंटन अकॅडमीचे अजित कुंभार,परबत कुंभार सर,ज्येष्ठ खेळाडू भानुदास कुलकर्णी सत्यवान शिवले,सौरभ गवादे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन अँकर चेतन पाटील यांनी व या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन धीरज अधिकारी,अजित कुंभार व परबत कुंभार यांनी केले आहे.

या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील कांहीं निकाल खालील प्रमाणे
पुरुष एकेरी
१) साई किरण इला (इमर्सन इंडिया) विजयी विरुद्ध अजिंक्य नातू (सिंडुलर इंडिया)(३०-५)
२) भारत चौधरी (ऑप्टिमायझर) विजयी विरुद्ध दर्शन काळे (बजाज ऑटो चाकण) (३०-१५)
३) आदित्य द्विवेदी (एचडी हुंडाई) विरुद्ध रोहित भट विजयी (ॲटलास कॉपको)
४) योगेश मठपती (बजाज ऑटो आकुर्डी) विजयी विरुद्ध भवानी सिंग (मिंडा कार्पोरेशन)(३०-२२)
पुरुष दुहेरी
१) गौरांग गुजराती,प्रल्हाद पत्की (थरमॅक्स) विजयी विरुद्ध मंजुनाथ नायडू,रितेश गरड (मॅग्नम फोर्ज)(३०-२७)
२) रोहित बट्ट,स्वप्नील फुलसुंदर (ॲटलास कॉपको) विजयी विरुद्ध प्रतिश कांबळे,सुमित गिरी (वोस्टलपाईन) (३०-१०)
मिश्र दुहेरी
१) संदीप कामन्ना, आदिती पाठक (टीकेआयएल) विजयी विरुद्ध फाणी,मालविका (प्राज इंडस्ट्रीज) (३०-१९)
महिला एकेरी
१) आकांक्षा दरगर (बजाज ऑटो आकुर्डी) विजयी विरुद्ध अनुष्का एम (एसकेएफ) )(३०-२६)
२) रिचा ढाणे (फॉर्विया) विजयी विरुद्ध सीमा जावळेकर (टाटा मोटर्स) )(३०-१७)
३) माधुरी कडाने (सहाना इंजिनिअरिंग) विजयी विरुद्ध अदिती पाठक (टीकेआयएल) )(३०-२४)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"