फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

दोन पिस्टलसह तडीपार गुंडास अटक!

दोन पिस्टलसह तडीपार गुंडास अटक!

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार असताना तडीपारीचा आदेश झुगारून आणि बेकायदेशीरपणे दोन पिस्टल मॅगझिनसह आणि एक जिवंत काडतुस असे एक लाख पाचशे रुपये किमतीचे शस्त्र जवळ बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तडीपार गुंडास अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर ज्ञानदेव ढावरे (वय 22, रा. छत्रपती शाहू महाराज हाउसिंग सोसायटी, पाचवा मजला, मिलिंद नगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी ढावरे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी 12 फेब्रुवारी 2024 मध्ये दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश दिला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 ची कोणतीही परवानगी न घेता सदर आदेशाचा भंग करून आरोपी शहरात दाखल झाला. गुरुवार 4 डिसेंबर रोजी रात्री सात वाजून 55 मिनिटांच्या दरम्यान पिंपरी स्मशानभूमी वॉल कंपाऊंडचे जवळ सार्वजनिक रोडवर आरोपीला पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली. याबाबत राजेंद्र भगवान बारशिंगे, पोलीस हवालदार ,पिंपरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दोन देशी बनावटीचे गावठी पिस्टलसह आरोपीस अटक!
पिंपरी : विनापरवाना दोन देशी बनावटीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असे एक लाख पाचशे रुपये किमतीचे शस्त्र जवळ बाळगल्याने पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दत्ताजी तानाजी कवठेकर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम उर्फ दुर्लभ सुरेश शेंडे (वय 22 ,रा. मु. पो. म्हणवत, ता. माण, जि. सातारा )या आरोपीस अटक केली आहे. विनापरवाना कोणतेही शस्त्र बाळगण्यास बंदी असताना आदेशाचा भंग केला. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पिंपरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"