मुळशी व पवना धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग !

मुळशी धरणातून 12,300 क्यूसेस विसर्ग
पिंपरी : मावळचे धरण आणि मुळशीचे मुळशी धराच्या पणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने दोन्ही धरणातील पाणी साठा सुमारे 78 टक्के झाला असून धरणातील पाणी पातळी नियंणत्रणात ठेवण्यासाठी पवना आणि मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदी काठच्या सर्व नागरीकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरण ,मुळशी धरण 78% , भरलेले आहे.
पवना धरणाच्या आरओएस व जी ओ एस नुसार पाणीसाठा करण्यास सुरुवात झालेली असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने 1025 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.

मुळशी धरणातून 12,300 क्यूसेस विसर्ग :- मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 8200 क्यूसेस विसर्ग सुरू असणारा विसर्ग दुपारी २:०० वाजता 12300 क्यूसेस करण्यात आलातरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन सुरेश कोंडूभैरी टाटा पॅावर यांनी केले आहे.
वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग 3977 क्यूसेक्स करण्यात येत आहे. येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी -जास्त करण्यात येईल. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.

