विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक, भावनिक विकासावर भर दिला जाणार : शेखर सिंह

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता – आमदार गोरखे
पिंपरी : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आमदार उमा खापरे यांची थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या प्राथमिक शाळा येथे, आमदार अमित गोरखे यांची पी.सी.एम.सी.पब्लिक स्कूल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर काळभोरनगर येथे तर आमदार शंकर जगताप यांची पिंपळे गुरव येथील पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल येथे विशेष उपस्थिती….
आपल्या महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे. त्या क्षमतांना योग्य दिशा देणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मूल्ये आणि मार्गदर्शन मिळाले पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे, आणि वेळोवेळी त्यांनी ती सिद्ध देखील केली आहे.” काळभोर नगर येथील महापालिकेचा माजी विद्यार्थी म्हणून आज याच शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी केले.
थेरगाव येथील शाळेतील कार्यक्रमात बोलताना विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी शिक्षक वर्ग हे मातीच्या गोळ्याला आकार देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थी घडतात. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वागतपर नाही तर नव्या शैक्षणिक वर्षात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असाच आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे आज या शाळेला भेट देता आली, ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे,असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या अभ्यास करून प्राविण्य मिळवावे आणि शाळेचे,शहराचे व राज्याचेही नावलौकिकात भर पडेल यासाठी अध्यापक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घ्यावे असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
पी.एम.श्री. पिंपरी चिंचवड मनपा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा म्हेत्रेवाडी क्र. ९२ या शाळेमध्ये आज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. आयुक्त सिंह यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील इनोवेशन लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहेच. पण आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक, भावनिक विकासावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्याचे नियोजन आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर यांनी केले.
आयुक्त सिंह म्हणाले, आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तकांचे वाटप तसेच डी.बी.टी. च्या माध्यमातून शाळा साहित्य वाटपाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे प्रामुख्याने लक्ष देताना विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले जात आहेत. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच भावनिक, सामाजिक प्रगतीकडे देखील लक्ष देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी देखील प्रत्येक शाळेने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळांकडून प्रशासनाला ज्या सूचना येतात, त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पिंपळे निळख येथील महापालिकेच्या शाळेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा निनाद करीत अतिरिक्त आयुक्तांचे स्वागत केले. त्यानंतर जांभळे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पिंपळे निळख येथील पीसीएमसी शाळेतील कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका आरती चोंधे, सचिन साठे, नितीन इंगवले, मुख्याध्यापक अण्णा जाधव यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
थेरगाव येथील कार्यक्रमाला महापालिका शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, माजी नगरसेवक तानाजी बारणे, अभिषेक बारणे उपस्थित होते.
काळभोरनगर या कार्यक्रमाला महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, मुख्याध्यापिका वैशाली तवटे, सुजाता इंदूलकर, पुष्पा नेवरे, अर्चना राऊत, पूनम उपरे, शैला लोखंडे, पूजा वंजारी, महेश शिर्के, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, वैशाली काळभोर, विशाल काळभोर, दिलीप दातीर पाटील, गणेश लंघाटे, दत्तात्रय तरासे, महादू नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी नगर हिंदी पीसीएमसी पब्लिक स्कूल (कमला नेहरू) येथील कार्यक्रमासाठी क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अल्पभाषा पर्यवेक्षिका मोमीन हमीदा, माजी नगरसदस्या निकिता कदम, मुख्याध्यापक शंकर पाल यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पीसीएमसी पब्लिक स्कूल वाल्हेकरवाडी मुले क्र. १८/१ येथील कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माजी नगरसदस्य शामराव वाल्हेकर,मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके,माजी नगरसदस्या आशा सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते सचिन वाल्हेकर, बापू म्हस्के, संदीप भालके, नाना शिवले, राणी गोफणे, शेखर चिंचवडे, रुपाली वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा वलटे, शिक्षिका विजया भूतकर, सुनिता पांढरकर, सुजाता पोकळे, रेश्मा मेश्राम, अश्विनी घुगे, नंदिनी खाडे, मंगल राऊत, स्वाती तावरे, गौरी कोल्हापुरे, अनिता महाजन, शिक्षक प्रवीण वैद्य, श्रीकुमार सुतार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.