फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

कासारवाडीत राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी शिल्प स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन!

कासारवाडीत राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी शिल्प स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन!

माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या संकत्पतेतून साकारणार शिल्प स्मारक प्रकल्प
पिंपरी : कासारवाडी येथील महानगरपालिका शाळेच्या प्रांगणात भव्य शिवस्मारक उभारण्यात येत आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांचा पुतळ्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत, ऊर्जा स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर असणे आवश्यक आहे. या उद्देशाने बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभागाच्या मार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे. सदर प्रकल्पासाठी 2 कोटी 96 लाख 75 हजार निधीची महानगरपालिकेकडून तरतूद करण्यात आलेली आहे.
स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, यांच्या हस्ते करण्यात आले.
राजमाता जिजाऊंचे संस्कार प्रत्येक कुटुंबातील मुलावर व्हावेत या विचारानुसार प्रेरित होऊन विद्यार्थी घडावेत,यासाठी शालेय आवारात या शिल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होत आहे. डिसेंबर अखेर स्मारकाचे काम , पूर्ण करून १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती साजरी करण्याचा मानस आहे असे माजी नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले.

जिजाऊ व बाल शिवराय शिल्प स्मारक
स्मारकाची उंची ६ फूट एवढी असून मेघडंबरीची उंची १५ फूट इतकी आहे शिल्प चौथरा अष्टकोनी असून यामध्ये शिल्पाच्या मागील बाजूस संस्कारसृष्टी उभारली जाणार आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ या बाल शिवरायांवर संस्कार करताना शिल्प प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हे शिल्प शिल्पकार मिलिंद किर्दत घडवत आहेत.

viarasmall
viarasmall

सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल एक गाव एक शिवजयंती समिती व माजी नगरसेवक श्याम लांडे मित्रपरिवार यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी उस्ताद बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे माजी नगरसेवक रामभाऊ पिंपळे, ज्ञानेश्वर थोरात, रतन लांडगे, रवी लांडगे, सुनील लांडगे, अमोल मोटे, अशोक पगारिया, विलास पगारिया, रमेश लांडगे, तुकाराम जवळकर, बापू भोसले, ज्ञानेश्वर लांडे, सहादु भालेकर, रोहिदास चव्हाण, वसंत बोरा, लघुउद्योजक संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे सलीम तनवर, अतुल दौंडकर, रुपेश चव्हाण, स्वप्निल चौधरी, विकी मस्के, चेतन मेस्ता, गणेश लांडे दत्ता पवार, सोमेश्वर जौंजाळ, ज्ञानेश्वर कवडे, दादासाहेब रसाळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"