राज्यात कोण किती जागा लढवतंय?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यभरात मतदानाचा आज उत्साह दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानासाठी घराबाहेर पडण्यास प्रारंभ केला आहे. कोणत्या पक्षाने किती जागांवर मतदार उभे केले आहेत, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
बहुतांश ठिकाणी उमेदवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सत्ताधारी गटात असलेल्या भारतीय जनता पार्टीचे १४९ जागांवर उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेना ८१ जागा लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ५९ जागांवर उमेदवार लढवत आहे. काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे ८६ जागांवर उमेदवार आहेत. शिवसेना (उबाठा) ९५ जागा लढवित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना १२५ जागांवर असून वंचित बहुजन आघाडी २०० जागांवर आहे. बसपचे उमेदवार २३७ जागांवर आहेत तर राज्यभरात दोन हजार ०८६ अपक्ष उमेदवार आज रिंगणात आहेत.
मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला..
येथे पाहा : https://www.instagram.com/p/DClLF7Ct8Up/?igsh=MWV3bHdzdnRpMzMwbA%3D%3D
मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाने यंत्रणा चोख पद्धतीने उभ्या केल्या आहेत. पोलिस बंदोबस्तासह अनेक हेल्पलाइन नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियंत्रित अधिकारी यांचे नाव व पदनाम क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता सारथी हेल्पलाईन नंबर –
१ श्रीम. शितल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी, अ क्षेत्रीय भेळ चौक, निगडी, प्राधिकरण, पुणे ४४ ८८८८००६६६६,
०२०-६७३३९९९९
२ श्री. अमित पंडीत, क्षेत्रीय अधिकारी, ब क्षेत्रीय लिंकरोड, एल्प्रो मॉल जवळ, चिंचवड, पुणे ३३ ८८८८००६६६६,
०२०-६७३३९९९९
३ श्री. तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी,क क्षेत्रीय नेहरुनगर, भोसरी, पुणे ४११ ०२६ ८८८८००६६६६
०२०-६७३३९९९९
हे ही वाचा : पुणे जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान https://tothepoints.org/15-64-percent-polling-in-pune-district-till-11-oclock/

४ श्री. श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी, ड क्षेत्रीय औंध रावेत बी.आर.टी रोड, रहाटणी, पुणे १७ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९
५ श्री. राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी,ई क्षेत्रीय ग्रोथ लॅब बिल्डींग, पांचर पोळ समोर, भोसरी ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

६ श्री. सिताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी, फ क्षेत्रीय लोकमान्य टिकळ चौक, निगडी, पुणे ४४ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९
७ श्री. किशोर ननवरे, क्षेत्रीय अधिकारी, ग क्षेत्रीय दिलिप वेंगसरकर क्रि. अकॅडमी, थेरगांव, ३३ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९
८ श्री. उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी, ह क्षेत्रीय महिला आय. टी.आय, कासारवाडी ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क :
येथे पाहा : https://www.instagram.com/p/DClYd2iNp_8/?igsh=ZGVwNXU2aTg5NHBw