कृत्रिम , विषारी व भेसळयुक्त चारशे लिटर ताडी जप्त; दोघांना अटक!

क्लोराल हायड्रेट (Chloral Hydrate ) या रासायनिक पदार्थाचा वापर
पिंपरी : निगडी वाहतूक नगरी भागात क्लोराल हायड्रेट (Chloral Hydrate ) या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम , विषारी व भेसळयुक्त विक्री करण्यासाठी बनवलेली चारशे लिटर ताडी जप्त करण्यात आली याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दारूबंदी पथकाने वाहतूक नगरी निगडी येथे केली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ गुन्हे शाखा रोहिदास पवार यांनी माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे दारूबंदी पथकास वाहतूक नगरी निगडी येथे क्लोराल हायड्रेट (Chloral Hydrate) या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम व विषारी ताडी विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे समजले . पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोबत छापा टाकून कारवाई केली. 400 लिटर रासायनिक भेसळयुक्त विषारी ताडी जप्त करण्यात आली असून ताडी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे .क्लोरोल हायड्रेट (Chloral Hydrate) यापासून तयार केलेली ही ताडी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून तिच्या सेवनाने गंभीर शारीरिक दुश्मन दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणी मौनेश यंकाप्पा गुत्तेदार (वय 24, देहूगाव, मूळ – रा रायचूर कर्नाटक), लक्ष्मण गुंडाप्पा हुलसुरे (वय 26, रा. टीव्हीएस शोरूमच्या पाठीमागे, आंबेडकर नगर, देहुगाव ,मूळ- रा. ता. निलंगा, जि. लातूर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे तपास करत आहेत अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांमार्फत यापुढेही कठोरपणे कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांना तात्काळ मोबाईल नंबर 77 98 100 112 या क्रमांकावर कळवावे असे आव्हान पोलिसांनी केले आहे .
ही कारवाई पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासोमोरे सहाय्यक पोलीस फौजदार राकेश पलांडे पोलीस हवालदार सागर सूर्यवंशी विक्रांत चव्हाण शरद गर्जे सचिन मोंटे उद्धव खेडकर सुमित देवकर लक्ष्मीकांत पतंगे श्यामसुंदर गुट्टे मितेश यादव यांनी केली आहे

