फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
कला साहित्य

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात!

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात!

28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत संमेलन
पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला असून 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत हे संमेलन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित आणि समर्थ युवा फाउंडेशन संयोजित या स्वरूपात संमेलन पार पडणार असून हे पुण्यातील 14 वे संमेलन ठरणार आहे.

viara vcc
viara vcc

पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे पुणे विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. अत्याधुनिक सुविधा, स्वतंत्र सभागृह, निवास आणि वाहनतळाची व्यवस्था या निकर्षावर पुणे विद्यापीठ सरस ठरले आहे. त्यामुळे एकमताने ही निवड करण्यात आली. संमेलनाची सुरुवात 28 जानेवारी 2027 रोजी सायंकाळी उद्घाटन समारंभाने केली जाईल. त्यानंतर 29, 30 आणि 31 जानेवारी या तीन दिवसात साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन 31 जानेवारी रोजी संमेलनाचा समारोप होईल असे सोमण यांनी सांगितले. संमेलनामध्ये व्यासपीठावर राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असे सोमण यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, समर्थ युवा फाउंडेशनजचे अध्यक्ष राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"