फक्त मुद्द्याचं!

14th June 2026
गुन्हेगारी

आळंदी येथील तीन चैन चोर जेरबंद ;मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई!

आळंदी येथील तीन चैन चोर जेरबंद ;मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई!

आळंदी : आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकी वरील दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई अमर कदम यांना गुन्ह्यातील अनोळखी आरोपींना बाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन चोरीस गेलेला चार लाख 95 हजार रुपये किंमतीची 33.810 ग्रॅम वजनाची चैन व चार चाकी वाहन जप्त करण्यात आले.

viara vcc
viara vcc

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस शिपाई अमर कदम यांना गुन्ह्यातील आरोपींना बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. नंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खाडे यांच्या पथकाने आरोपी वैष्णव शरद कदम (वय 20), सचिन जालिंदर कदम (वय 42), विजय ज्ञानेश्वर कदम (वय 33, सर्व रा.मू.पो निरगुडी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 4 लाख 95 हजार रुपये किंमतीची 33.810 ग्रॅम वजनाची चैन, आठ लाख रुपये किंमतीचे चार चाकी वाहन जप्त केले. आरोपीस पुढील तपासासाठी आळंदी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खाडे, पोलिस अंमलदार गणेश शिंदे ,नितीन लोखंडे, अमर कदम, चंद्रकांत गडदे, सोमनाथ मोरे, नितीन उंब्रजकर, हर्षद कदम, मोहसीन अत्तार, विनोद वीर, गणेश सावंत, औदुंबर रोंगे यांनी केली. आळंदी येथील चैन चोर जेरबंद मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"