Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयावरील लाइटिंग काढताना पहिल्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू!

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयावरील लाइटिंग काढताना पहिल्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू!

दोघाविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालयावरील लाइटिंग काढण्यासाठी ठेकेदाराने कोणतेही सुरक्षा न पुरवल्याने निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ‘ह’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालय कासारवाडी येथे घडली .राहुल साबळे असे मयत तरुणाचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी विठ्ठल महादू साबळे (वय 65, रा. विजयनगर ,श्री हॉस्पिटलच्या समोर काळेवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम इंगळे, अब्दुल गुलाम बेग (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मुलगा राहुल साबळे हा ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी येथील पहिल्या मजल्यावर पत्र्याच्या शेडवरील लाइटिंग काढण्यासाठी गेला होता. इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल या फॉर्मचे मालक व ए लाईट अँड डेकोरेशन या दुकानाचे मालक यांनी ही लाइटिंग काढण्यासाठी फिर्यादीच्या मुलाला आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवली नव्हती. त्याला कोणत्याही प्रकारे सेफ्टी बेल्ट, शूज, हेल्मेट, सुरक्षित शिडी उपलब्ध केली नाही. निष्काळजीपणा केल्यामुळे सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या शेड वरील लाइटिंग काढून झाल्यावर फिर्यादी यांचा मुलगा राहुल साबळे हा खाली उतरत असताना त्याचा तोल गेला व तो उंचीवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. यातच राहुल साबळे हा मयत झाला. दापोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"