Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

दहीहंडीत विनापरवाना डीजेचा वापर; लवळे, म्हाळुंगे व भुगाव येथील तीन मंडळांवर गुन्हे दाखल!

दहीहंडीत विनापरवाना डीजेचा वापर; लवळे, म्हाळुंगे व भुगाव येथील तीन मंडळांवर गुन्हे दाखल!

बावधन पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : दहीहंडी उत्सवात विनापरवाना प्रतिबंधित ध्वनीक्षेपन यंत्रणा (डीजे) आवाजाची मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याने लवळे, म्हाळुंगे व भुगाव येथील तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिली.

gokul astami
gokul astami

गुन्हे दाखल झालेल्या मंडळांमध्ये अखिल लवळे गाव दहीहंडी उत्सव मंडळ, लवळे, ता. मुळशी, सूर्यमुखी गणेश मंडळ म्हाळुंगे, पुणे, बालमित्र मंडळ माताळवाडी फाटा, भुगाव, ता. मुळशी यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे आदेशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावरील आवाजाच्या मर्यादेवर बंदी असताना विनापरवाना प्रतिबंधित ध्वनीक्षेपक यंत्रणा (डीजे) मोठमोठ्या आवाजात वाजवून आवाजाची मर्यादा ओलांडली. पोलिसांनी दिलेले आदेशाची अवमानता करून सार्वजनिक ठिकाणचे वाहतुकीस अडथळा निर्माण करून वाहतूक ठप्प केली. सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाऱ्या या मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सुराशे, पोलीस हवालदार भैरट, हंगे यांनी कारवाई केली.

पोलीस ठाणेचे हद्दीत विनापरवाना ध्तनीक्षेपक साऊंड सिस्टिम (डीजे) यंत्रणा यांचा वापर करून मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"