चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीस 24 तासात अटक!

पिंपरी : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या नराधम पतीस बावधन पोलिसांनी विजापूर कर्नाटक येथून 24 तासात अटक करून बेड्या ठोकल्या. परशुराम भागप्पा हरिजन (वय 48, तोडकर वस्ती,भुगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोनचे प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडकर वस्ती, भुगाव येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी निलाबाई परशुराम हरिजन (वय 42, रा. तोडकर वस्ती, भुगाव) हिचा कोणत्यातरी धारदार शास्त्राने गळा चिरून आरोपी याने खून केला. खून करून घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता. बावधन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचे तपासासाठी पोलीस उपायुक्त यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे आरोपी यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी यांचा पळून जाण्याचा मार्ग काढण्यात आला.
तात्काळ तपास पथकाकडील दोन टीम तयार करून दोन राज्यांमध्ये पथके रवाना करण्यात आली. आरोपी हा विजापूर कर्नाटक या ठिकाणी शेतात लपून बसलेला होता. स्थानिक पोलीस व नागरिकांच्या मदतीने आरोपी परशुराम भागप्पा हरिजन यास ताब्यात घेऊन बावधन पोलिसांनी धडाडीची कारवाई केली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार ,पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, पोलीस शिपाई पाटील, डंगारे तसेच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई करण्यात आली.

