Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

काळेवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्ळावर मध्यरात्री कारवाई!

काळेवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्ळावर मध्यरात्री कारवाई!

मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
पिंपरी : काळेवाडी येथील राजवाडे नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज सोमवार सात सप्टेंबर रोजी ग क्षेत्रीय कार्यालयाने धडक कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 7400 चौरस फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

gokul astami
gokul astami

ही कारवाई महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या वेळी शहर अभियंता, सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी, विद्युत) उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, ब, क, ड, व ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) यांच्यासह कार्यकारी अभियंता (विद्युत स्थापत्य) उपस्थित होते.

या कारवाई मोहिमेत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे दहा कार्यकारी अभियंता, 28 उपअभियंता, पाच कनिष्ठ अभियंता आणि 16 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जवळपास 75 एमएसएफ जवानांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. एक फोकलेन, पाच जीसीबी आणि 25 मजुरांच्या साह्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी दोन अग्निशामक वाहने आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"