गाड्या बुकिंगच्या नावाखाली शोरूमची 2 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ग्राहकाकडून गाड्या बुकिंग च्या नावाखाली रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण 2 लाख 91 हजार आठशे रुपये स्वतःच्या खात्यावर स्वीकारून ते शोरूमच्या खात्यावर न भरता ग्राहकांची आणि शोरूमची फसवणूक करण्यात आली. ही घटना डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत सम्राट ऑटोमोबाईल आउटलेट किवळे, ता. हवेली येथे घडली.

याप्रकरणी सम्राट ऑटोमोबाईलच्या सेल्स मॅनेजर (रा. आंबेडकर चौक, एल्फरोमॉलच्या जवळ चिंचवडगाव या महिलेने देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. सम्राट ऑटोमोबाईलचे सेल्स एक्झिटिव्ह म्हणून काम करणारे किशोर सुधाकर बागडे (वय ४१, रा. संगमवाडी, शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे सम्राट ऑटोमोबाईल शोरूम मध्ये सेल्स एक्झिटिव्ह म्हणून काम करत होते. डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत कामास असताना आरोपीने ग्राहकाकडून गाड्या बुकिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन पद्धतीने 2 लाख 91 हजार आठशे रुपये स्वतःच्या खात्यावर स्वीकारून ते शोरूमच्या खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्या करता वापरले आहे. ग्राहकांची व फिर्यादी यांच्या शोरूमची फसवणूक केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.

