जेष्ठाची 11 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : डिजिटल अरेस्ट आणि मनी लॉड्रिंगच्या केसची भीती दाखवून सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची 11 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना 11 ते 21 ऑगस्ट दरम्यान निगडी प्राधिकरणातील सिंधूनगर येथे घडली.

याप्रकरणी दीपक काशिनाथ पंडित (वय 59, निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्ला, संदीप रावत, स्वतःला सीबीआय अधिकारी सांगणारा करण शर्मा, संबंधित बँक खातेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीला फोन करून स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादीच्या मोबाईल वरून महिलांना त्रास देणारे मेसेज पाठवले असल्याचे तसेच मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये नाव आल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती घातली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट पीडीएफ पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर बँक खात्यातील रक्कम पडताळणी करून परत देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी कडून एकूण 11 लाख 90 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

