राष्ट्रपती पोलीस पदक पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे यांना प्रदान !

पिंपरी : राष्ट्रपती महोदयांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) जाहीर केले होते.
या अनुषंगाने आज दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी दरबार हॉल, लोकभवन, मुंबई येथे आयोजित पदक अलंकरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय सेवेची व कर्तव्यनिष्ठेची पावती असून, पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब आहे.


