Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे रहिवासी दाखला मिळवून पंतप्रधान आवास योजनेतून मिळविला फ्लॅट!

बनावट कागदपत्राद्वारे रहिवासी दाखला मिळवून पंतप्रधान आवास योजनेतून मिळविला फ्लॅट!

शासनाची फसवणूक
पिंपरी : उत्तर प्रदेश येथील रहिवासी असताना बनावट कागदपत्राद्वारे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे दाखवून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीए कडून व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट मिळवून शासनाची फसवणूक केली. ही घटना 21 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सेक्टर नंबर 12 भोसरी या ठिकाणी घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी अशोक शिवाजी भोगल पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) पिंपरी चिंचवड यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद दानिश अब्दुल मजीद शेख (वय 45 ,फ्लॅट नंबर 904, नववा मजला बिल्डींग नंबर 20, व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सेक्टर नंबर 12, भोसरी), महिला आरोपी (वय 39 )आणि इरफान शेख (रा, खराळवाडी)( एजंट) .आरोपी क्रमांक एक अटक आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने त्याचा जन्म उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला असताना खडकी पुणे, या ठिकाणी बारावीचे शिक्षण डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू जुनियर कॉलेज, खडकी येथे झाले बाबत कॉलेजचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच त्यांचे वडील अब्दुल मजीद फशीद यांचा नगरपरिषद शाळा क्रमांक एक, कळंब ,जि. धाराशिव येथील निर्गम उतारा असे बनावट कागदपत्र एजंट आरोपी क्रमांक तीन यांच्याकडून बनवून घेऊन या बनावट कागदपत्राच्या आधारे हवेली तहसील कार्यालय यांच्याकडून 2021 मध्ये महाराष्ट्रामधील रहिवासी दाखला प्राप्त करून घेतला.

आरोपी क्रमांक एक यांची पत्नी आरोपी क्रमांक दोन ही उत्तर प्रदेश येथील रहिवासी असताना आरोपी एक व दोन यांनी महाराष्ट्राचा रहिवासी दाखल्याचा वापर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना देय असणारा फ्लॅट पीएमआरडीए आकुर्डी पुणे या शासकीय संस्थेत करून व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था, भोसरी येथील बिल्डिंग नंबर बी / 20 मधील फ्लॅट नंबर 904 स्वतःचे नावावर करून शासनाची फसवणूक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेर, पोलीस उपनिरीक्षक मिसाळ हे तपास करत आहेत,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"