Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

‘क्रेडिट कार्ड’ची माहिती घेऊन 93 हजार रुपयांना गंडा!

‘क्रेडिट कार्ड’ची माहिती घेऊन 93 हजार रुपयांना गंडा!

पिंपरी : कंपनीत काम करत असताना एका महिलेने फोन करून क्रेडिट कार्ड बद्दल माहिती विचारून चेक डिजिटल प्रायव्हेट लि मध्ये ट्रांजेक्शन करून फिर्यादी महिलेच्या बँक खात्यावरून 93 हजार 159 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. ही घटना सहा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत इन्फोसिस कंपनी हिंजवडी फेज टू हिंजवडी येथे ऑनलाइन घडली.

याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने (रा. राहुल मुळे यांचे फ्लॅट नंबर 602, एस ऑगस्ता डॉलर कंपनीजवळ, हिंजवडी फेज नंबर दोन, हिंजवडी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल नंबर धारक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या हिंजवडी आयटी पार्क मधील एका कंपनीत काम करत असताना त्यांना आरोपी महिलेने फोन करून क्रेडिट कार्ड बद्दल माहिती विचारून चेक डिजिटल प्रायव्हेट लि मध्ये ट्रांजेक्शन करून ऑनलाईन फिर्यादीची 93 हजार 159 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करीत आहेत.

indra dairy
indra dairy

व्यवसाय करण्याच्या आमिषाने महिलेची 80 लाखाची फसवणूक!
पिंपरी : भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरू करण्याचे अमिष दाखवत एका महिलेची 80 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. 13 जुलै 2024 ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हा प्रकार घडला.

थेरगाव येथील 35 वर्षीय महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.समाधान पोपट गेजगे (वय 40, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेजगे यांनी राहटणी येथे पाच गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी 1 कोटी 84 लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यापैकी 80 लाख 53 हजार रुपये फिर्यादी यांनी द्यावेत आणि उर्वरित रक्कम आपण भरू असे सांगितले. जमीन खरेदी केल्यानंतर पी.व्ही.डेव्हलपर्स नावाने भागीदारी संस्था स्थापन करून व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या पतीने 80 लाख 53 हजार रुपये दिले. मात्र आरोपीने जमीन खरेदीची कागदपत्रे दाखवली नाहीत. पैसे परत मागितल्यावर खात्यात पुरेशी रक्कम नसलेले धनादेश देऊन तसेच बनावट संदेश पाठवून दिशाभूल केल्याचा आरोप आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"