Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
पिंपरी-चिंचवड

चिखली येथील ५ अनधिकृत बांधकामावर कारवाई!

चिखली येथील ५ अनधिकृत बांधकामावर कारवाई!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी महापालिका “फ” तोरणा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.१ चिखली येथील एकूण ५ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असून, सुमारे अंदाजे १२०० चौरस मीटर बांधकामाचे निष्कासन करण्यात आले .सदर कारवाई ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करणेत आली. आयक्त डॅा. विजय सुर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीम.तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc
indra dairy
indra dairy

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम आयुक्त डॉ. विजयसिंह सूर्यवंशी यांनी सुरू केली असून महापालिका 10 क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत .संबंधित कार्यक्षेत्रातील बीटनिरीक्षकांना माहिती घेऊन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज शुक्रवारी चिखली येथे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पाच अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईस उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ,सूरज माने इत्यादी अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. ६ अतिक्रमण पोलीस तसेच सदर कारवाई साठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान व मनपा मजूर २ आणि १० कंत्राटी मजूर उपस्थित होत़े. सदर कारवाई साठी २ टॅक्टर ब्रेकर २ जेसीबी वापरण्यात आले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"