फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा!

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा!

सोसायटीधारकांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या नेतृत्वावर विश्वास
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकास आणि सोसायटीधारकांचे हित लक्षात घेता पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार लांडगे यांच्यासोबत फेडरेशनच्या कोअर टीमची बैठक नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

viara vcc
viara vcc

. सोसायटीधारकांच्या विविध प्रश्नांवर आमदार लांडगे यांनी सातत्याने सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेतल्यामुळेच हा पाठिंबा देण्यात आल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी याबाबत अधिकृत घोषणा करताना सांगितले की, “शहरातील हाऊसिंग सोसायट्यांशी संबंधित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पार्किंग, मालमत्ता कर आदी प्रश्नांवर आमदार महेश लांडगे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत फेडरेशन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.”

“पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न केवळ ऐकून न घेता ते सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रत्यक्ष कृती केली आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, कर आकारणी, पार्किंग आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली..” – संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"