Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

पेट्रोल पंपावरील कामगाराने 25 लाख रुपयांचा केला अपहार!

पेट्रोल पंपावरील कामगाराने 25 लाख रुपयांचा केला अपहार!

पिंपरी : पेट्रोल पंपावरील कामगाराने स्वतःच्या फायद्या करिता पंपावरील पेट्रोल व डिझेलचे पैसे यूपीआयचे माध्यमातून स्वतःच्या बँक अकाउंट वर व पेट्रोल पंपावरील इतर कामगारांच्या बँक अकाउंट वर पाठवून 25 लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना एक एप्रिल ते 22 मे 2025 या कालावधीत आदित्य पेट्रोल पंप अंबी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी संजय रमेश बाविस्कर (रा. फ्लॅट नंबर एक, आदित्य हाईट्स, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. धर्मेंद्र रामाश्रय पांडे (रा. बागवेढा, जमशेदपूर, पूर्वीसिंह भूम, झारखंड), विजय बाबुराव त्रिभुवन (रा. वराळे, ता. मावळ), चैतन्य विठ्ठल चांदेकर रा. मनोहर नगर लेन नंबर 3, प्लॉट नंबर 167) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून स्वतःच्या फायद्या करिता पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलचे पैसे यूपीआयचे माध्यमातून स्वतःच्या बँक अकाउंट वर व पेट्रोल पंपावरील अन्य कामगारांच्या बँक अकाउंट वर पाठवून 25 लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. याशिवाय आरोपीने पेट्रोल पंपावरील स्टॉक रजिस्टर मध्ये खोटे हिशेब लिहून फिर्यादीची विश्वासाने फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोवारकर तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"