Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

31st October 2026
पिंपरी-चिंचवड

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी अखेर भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू!

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी अखेर भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू!

पिंपरी-चिंचवडसह चाकणच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि खेडच्या औद्योगिक पट्ट्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडून आज मार्गाचे मार्किंग सुरू झाले असून, भूसंपादन प्रक्रियेलाही वेग आला आहे. चाकण परिसरातील अनेक कंपन्या वाहतुक कोंडी आणि मुतभूत सुविधांच्या अभावाला कंटाळून स्थलांतरीत होण्याच्या तयारीत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

viara vcc
viara vcc

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ वाहतूक कोंडी सोडविणारा प्रकल्प नसून पुणे–पिंपरी-चिंचवड–चाकण–खेड या संपूर्ण औद्योगिक पट्ट्याच्या विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. या मार्गामुळे नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पाचे भूसंपादन कासव गतीने सुरु असल्याने उद्दोजक अस्वस्थ होते. प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी त्यांची मागणी होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा सातत्त्याने आमदार लांडगे यांनी लावून धरला आहे.

आता नगरविकास विभागाकडून मार्गाचे मार्किंग सुरू झाल्याने आणि भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाल्याने प्रशासकीय गती मिळाल्याचे चित्र आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठ्या उद्योगांची संख्या आहे. मात्र, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे उद्योगांच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब पल्ल्याची वाहतूक अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत होणार असून, उद्योगांसाठी वेळ, इंधन आणि लॉजिस्टिक्स खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे लांडगे यांनी अधोरेखित केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"