Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न दोघांवर गुन्हा!

बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न दोघांवर गुन्हा!

पिंपरी : मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न देहूरोड येथे करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिन्कू संतोष मल्होत्रा (वय 34) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश पुराणलाल अग्रवाल (वय 68), विशाल सतीश अग्रवाल (वय 42 दोघे रा देहूरोड )यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील 4.5 गुंठे जमिनीपैकी 2.25 गुंठे जमिनीवर हक्क दाखवण्यासाठी आरोपींनी आपसात संगणमत करून त्यासाठी वीस रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीची बनावट पावती तयार करून तसेच फिर्यादीच्या मृत नातेवाईकांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. बनावट दस्तऐवज तयार करून त्या कागदपत्राच्या आधारे जमीन हस्तांतरणाचा हक्क असल्याचा दावा करीत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

मारुंजी येथे अज्ञात व्यक्तीचा खून
पिंपरी : एका तीस ते पस्तीस वयाच्या व्यक्तीचा अज्ञात इसमाने हनुवटीवर व डोक्यात कशाने तरी मारून त्याचा खून केला. ही घटना गुरुवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी मारुंजी सर्वे नंबर आठ येथील साईरंग डेव्हलपर्स यांच्या प्लॉटिंग मधील पत्र्याच्या शेड जवळ, ता. मुळशी येथे घडली.

या प्रकरणी सुयश गजानन बुचडे (वय 40, रा. सिद्धिविनायक नगर, ग्रामपंचायत ऑफिस शेजारी मारुंजी, ता. मुळशी )यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका पुरुष जातीच्या अंदाजे 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने हनुवटीवर व डोक्यात कशाने तरी मारून खून केला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस निरीक्षक पांढरे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"