Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

30th October 2026
गुन्हेगारी

प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाल्याने पत्नीचा खून;आरोपीची आत्महत्या!

प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाल्याने पत्नीचा खून;आरोपीची आत्महत्या!

पिंपरी : पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाल्याने पत्नीचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्या केली. ही घटना बुधवार 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या पहाटे पूर्वी ता. खेड येथील बाजीराव बदले यांच्या भाड्याच्या खोलीत घडली.

याप्रकरणी बंडू आत्माराम धुमाळ (वय 58, रा. मु. पो. शिवनी) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . महादेव मारुती इगवे (वय 35, कुरुळी, ता. खेड, मुळगाव -पो. पिसेगाव, ता. केज, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरूळी गावचे हद्दीत अमित बाजीराव बधाले यांचे भाडेच्या खोलीत फिर्यादीचे जावई आरोपी याने निलेश दिलीप कांबळे व फिर्यादीची मयत मुलगी यांचे प्रेम संबंध माहिती झाल्याने आरोपीने पत्नी प्रियंका हिचा गळा आवळून खून केला आणि स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पिंजारी व पोलीस उपनिरीक्षक जायभाय हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तडीपार आरोपी कोयत्यासह अटक!
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दोन वर्षाकरिता तडीपार केलेला असतानाही कोणतीही परवानगी न घेता वाकड परिसरात प्रवेश करून कोयता घेऊन फिरणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवार 12 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली .

पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. सुनील उर्फ दाद्या मोहन शिंदे (वय 40 ,सध्या- रा. संगमनेर, अहिल्यानगर, मूळ- रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या कार्यालयीन आदेशानुसार आरोपीला 3 एप्रिल 2026 पासून दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. आरोपीने कोणतीही परवानगी न घेता पुन्हा आपल्या हद्दीत वावरत होता .म्हातोबा नगर झोपडपट्टी येथील परफेक्ट बेकरी समोर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कोयता मिळून आला. वाकड पोलीस तपास करत आहेत. तडीपार आरोपी कोयत्यासह अटक!

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"