फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकाअतिरिक्त आयुक्तपदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती!

पिंपरी-चिंचवड महापालिकाअतिरिक्त आयुक्तपदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती!

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची बदली
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची नगर विकास विभाग ,मंत्रालय येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (भारतीय प्रशासन सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेत शासन निर्णयानुसार तीन अतिरिक्त आयुक्त पदे मंजूर असून त्यापैकी एक पद हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांसाठी सुनिश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार विजयकुमार खोराटे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी (भारतीय प्रशासन सेवेतील) कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने विजयकुमार खराटे यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"