फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
गुन्हेगारी

खेड येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार!

खेड येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार!

पंचवीस संचालक असून एकूण 36 आरोपी
चाकण : भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकी बुद्रुक, ता. खेड या संस्थेच्या संचालकांनी आर्थिक फायद्या करिता खोटी व बनावट दस्तऐवज बनवून ठेवीदारांचा विश्वासघात करून सहा कोटी ५३ लाख ९२ हजार 42 रुपयांची फसवणूक केली आहे .ही घटना 2013- 14 ते 2017 -18 या कालावधीमध्ये घडली आहे. याबाबत सुनील मथुरा काळे (वय 55, रा. कमल विहास हाउसिंग सोसायटी, ब्लॉक बी आठ, मोहन नगर, धनकवडी, पुणे) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

रामदास हिरामण कड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे, बाळासाहेब पंडित गारगोटे, रवींद्र नामदेव गारगोटे, अनिल गोविंद टोपे, शिवाजी बाबुराव जरे, काळूराम पांडुरंग टोपे, राजाराम किसन टोपे, सुरेश रंगनाथ लोखंडे, दत्तात्रय वाल्मिक गोरे, शांताराम बापू जगताप, विमल बबन गारगोटे, रामदास ज्ञानेश्वर जाधव, गोरख बाबूजी टोपे, सुरेखाताई लक्ष्मणराव टोपे, मारुती ज्ञानोबा गारगोटी, राहुल रामदास टोपे, दत्तात्रेय संतु टोपे, अंकुश रामदास जरे, निलेश हनुमंत टोपे, सुरेश शिवाजी टोपे, संतोष दत्तात्रय टिपरे, सुरेखा लहू गारगोटे, सुरेखा संजय टोपे, काळूराम लक्ष्मण गारगोटे, शिवाजी दगडू टोपे, सुरज लक्ष्मण टोपे, सुरेखा लक्ष्मण टोपे, शिवाजी किसन भोंडवे, सारिका रोहिदास गारगोटे, रोहिदास तुकाराम गारगोटे, सुरेखा सुरेश लोखंडे, अनिता काळुराम गारगोटे, विशाल दत्तात्रय पवळे, रामदास संतु टोपे (सर्व वाकी बुद्रुक, ता. खेड ,जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी एक ते पंचवीस संचालक असून असे एकूण 36 आरोपी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगनमताने कट रचून स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज ,वैयक्तिक कर्ज, जामीनकी कर्ज, वाहन तारण कर्ज, ठेव तारन कर्ज, जमा पावत्यांच्या रकमा रोजकिर्दीस जमा न घेणे, बँक भरणा नावे दर्शवणे, मात्र बँकेत जमा नोंद नसणे, बचत ठेव खात्यामधून बोगस सहीने रखमा काढणे, बोगस खर्च नावे टाकणे ,पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून गुंतवणूक दर्शविणे मात्र संस्थादप्तरी काही पुरावे नसणे, दैनंदिन ठेव कमी शिल्लक असताना ज्यादा रक्कम नावे टाकून हात शिल्लक घटविणे, रोज किरधीस आरंभी शिल्लक कमी घेणे इत्यादी प्रकारे खोटी बनावट दस्तऐवज बनवून ठेवीदार, खातेदार, सभासद यांची सुमारे सहा कोटी 53 लाख 92 हजार 42 रुपयांची फसवणूक केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"