फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
पिंपरी-चिंचवड

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी परिसरात आज नाल्यावरील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी, न्यू डी.पी. रस्ता, शिवालय कॉलनी या भागांचा समावेश असून एकूण अंदाजे ३८२.०४ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

viara vcc
viara vcc

ही कारवाई आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंता जयवंत रोकडे यांनी कारवाईचे नेतृत्व केले.

कारवाईदरम्यान महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले, ज्ञानराज खंडाळे व सौरभ शिरसाठ हे सहभागी होते. तसेच एम.एस.एफचे १० जवान, १ पोलिस कर्मचारी, ५ महापालिका मजूर व ४ ठेकेदार मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अतिक्रमणे हटविण्यासाठी १ जेसीबी ब्रेकर व १ जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला.

दरम्यान, नाल्यांवर किंवा सार्वजनिक जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये. अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. भविष्यातही अशा अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"