फक्त मुद्द्याचं!

6th May 2026
गुन्हेगारी

घरफोडी करणारी टोळी जेरबंद 29 लाख 44 हजाराचा माल जप्त!

घरफोडी करणारी टोळी जेरबंद 29 लाख 44 हजाराचा माल जप्त!

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाची कारवाई
पिंपरी: घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील सराईत टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कारवाई करीत जेरबंद केले. या टोळीकडून 29 लाख 44 हजार 700 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. यामुळे 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सनिशिंग पापासिंग दुधानी (वय 24 ,रा. हडपसर, पुणे ),जलसिंग रजपूत सिंग दुधानी (वय 24 ,रा. हडपसर, पुणे ) व मनीष बाबुलाल कुशावाह (वय 28, रा. गाव कैलास, तहसील कैलास, जि. मुरायणा, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हिंजवडीतील घरफोडीतून चोरलेली सेलेरिओ कार रावेत येथील आणखी एका चोरीत वापरल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा संबंध लावून चोरट्यांचा मार्ग आणि हालचालींचा मागोवा घेतला. त्यानुसार सोमाटणे टोल नाक्यावर सापळा रचून कार अडवण्यात आली. अडथळा जाणवताच गाडीत बसलेल्या आरोपींपैकी एकाने पिस्तुलातून गोळी झाडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या तिघांना जेरबंद केले .त्यांच्याकडून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, हत्यारे आणि दागिने जप्त केले. दागिने खरेदी करणारे किरपाल सिंग दुधानी, शांताराम कांबळे आणि अक्षय चनाल यांनाही अटक करण्यात आली.

आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार असून त्यांच्यावर 70 पर्यंत गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे आणि पथकातील अंमलदार संजय गवारे, तुषार शेटे, विक्रम कुदळे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड ,विक्रांत चव्हाण, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद्, अमर राणे, धनंजय जाधव, सुखदेव गावंडे महत्त्वाची भूमिका बजावली.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"