Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक; 69 वाहन चालकांकडून पावणेचार लाखाचा दंड वसूल!

शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक; 69 वाहन चालकांकडून पावणेचार लाखाचा दंड वसूल!

पिंपरी : शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त विशेष मोहीम राबवत 69 वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत 3 लाख 76 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविणे, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक केल्याच्या तक्रारी आल्यानंतर वाहतूक शाखेने आरटीओसी समन्वय साधून विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत 29 जून, 30 जून ,दोन जुलै आणि 20 जुलै या चार दिवसात पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिखली, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत संयुक्त तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत 181 शालेय वाहतूक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 69 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक आयुक्त वाहतूक (दोन), सत्यजित आदमाने यांनी ही कारवाई केली. शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक; 69 वाहन चालकांकडून पावणेचार लाखाचा दंड वसूल

viara vcc
viara vcc

कंपनीच्या मालाचा अपहार ;एका व्यक्तीवर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीचे साहित्य दिलेल्या ठिकाणी न पोचवता चालकाने विश्वासघात करून साहित्याचा अपहर केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 13 जुलै, 23 जुलै 2026 या कालावधीत कोरेगाव येथील एका कंपनीत घडली.

याप्रकरणी उमेश चंद्रकांत शिंदे (वय 43, ब्राह्मणवाडी, वडगाव मावळ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिकप चालक अनिल पांडुरंग शिर्के (वय 27, टाकवे बुद्रुक, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीताला कंपनीचे साहित्य वाहतुकीसाठी विश्वासाने दिले होते. मात्र त्याने ते साहित्य कंपनीत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून ठेवले. यामध्ये असेम्ब्लींचे 44 हजार 436 रुपये किंमतीचे साहित्य आणि इतर माल मिळून अपहार केला आहे. कंपनीच्या मालाचा अपहार ;एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"