Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर ; ४७२९ रक्तपिशव्यांचे संकलन!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर ; ४७२९ रक्तपिशव्यांचे संकलन!

३२ प्रभागांतून ४३ ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आणि पिं.चिं.मनपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, २२ जुलै रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील ३२ प्रभागांतून तब्बल ४३ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

viara vcc
viara vcc

आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृहनेता प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडे, विकास डोळस यांच्यासह 32 प्रभागातील नगरसेवक – नगरसेविका तसेच मंडल अध्यक्ष भाजपा पदाधिकारी यांनी महा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.

या महाआरोग्य व रक्तदानाच्या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांनी, युवकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान केले. तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील विविध प्रभागांमधील शाळा, मंगल कार्यालय, सभागृह, देवस्थाने आणि संपर्क कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ४३ केंद्रांवर दिवसभर उत्साह पाहायला मिळाला. या सर्व केंद्रांवर मिळून एकूण ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले आहे.
रक्तदानासारख्या पवित्र सामाजिक उपक्रमात पिंपरी-चिंचवडच्या जनतेने दाखवलेले हे प्रेम आणि सामाजिक जाणीव वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. तसेच, या महारक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करणारे सर्व रक्तदाते नागरिक यांचे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"