Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून 88 लाखांची फसवणूक!

फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून 88 लाखांची फसवणूक!

पिंपरी : फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास 35 ते 40 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाची 88 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 2 जून ते 25 जून 2026 या कालावधीत सी 604 ,विवा हॉलमार्क, डीएसके रानवारा रोड ,पाटील नगर, बावधन येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी उद्योजक अभिजीत प्रकाश कुलकर्णी (वय 48, रा. सी 604, डीएसके रानवारा रोड, विवा हॉलमार्क, पाटील नगर ,बावधन) यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सौ दिव्या अग्रवाल शर्मा (रा जोरबाग ,लोधी कॉलनी, न्यू दिल्ली), टेलीग्राम धारक, लिंक धारक, बँक अकाउंट धारक व त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक दिव्या अग्रवाल शर्मा यांनी फिर्यादीस मोबाईल फोनवरून फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात 35 ते 40 टक्के पेक्षा जास्त नफा कमवून देऊ असे आमीष दाखवले आणि लिंक पाठवून त्यावर अकाउंट ओपन करण्यास सांगितले. टेलिग्राम आयडी व whatsapp द्वारे पाठवलेल्या वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पैसे भरण्यास सांगून ती रक्कम काढण्यासाठी पुन्हा वेगवेगळे टॅक्सची कारणे सांगून 88 लाख 19 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस निरीक्षक गायकवाड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"