फक्त मुद्द्याचं!

2nd June 2026
गुन्हेगारी

कंपनी अधिकाऱ्यांनी केली 11 लाख 25 हजाराची फसवणूक!

कंपनी अधिकाऱ्यांनी केली 11 लाख 25 हजाराची फसवणूक!

पिंपरी : हिंजवडी येथील थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा लिमिटेड कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी संगणमत करून फिर्यादी आणि साक्षीदारांकडून कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर 2025 ते आज पर्यंत गेरा इम्पोरियम राईज, दहावा मजला, विप्रो सर्कल, हिंजवडी, फेज टू येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सौरव राजन नायर (वय 25 ,रा. देहूरोड, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षल भानुदास ठाकरे (सीईओ), ध्रुवील पारेख (ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड), सौम्या सिंग (एच आर व थीनटेक टेक्नॉलॉजी प्रा लिमिटेड) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थीनटेक टेक्नॉलॉजी प्रा लिमिटेड कंपनीतील वरील तीन आरोपींनी संगणमताने फिर्यादी व साक्षीदारांकडून कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांच्याकडून काम करून घेऊन, वेगवेगळी कारणे देऊन त्यांचा विश्वासघात करून प्रत्येकाकडून 15000 रुपये व त्यांनी दोन महिने केलेल्या कामाचा पगार असे एकूण 11 लाख 25 हजार रुपये न देता ती रक्कम स्वतःसाठी वापरून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगनेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"