फक्त मुद्द्याचं!

2nd June 2026
गुन्हेगारी

दुचाकी डिव्हाडरला धडकून तरुणाचा मृत्यू!

दुचाकी डिव्हाडरला धडकून तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव वेगाने दुचाकी चालवून डिव्हाडरला धडकून दुचाकी वरील पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. ही घटना रविवार 31 मी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मनोहर पर्रीकर अंडरपास, सुदर्शन चौक या ठिकाणी घडली. अमन आयात शेख (वय 22) असे मृत्यू पावलेल्या तरुमाचे नाव आहे.

याप्रकरणी प्रज्वल प्रशांत शिंदे (वय 22, रा. सर्वे. नंबर 59, गोकुळ नगर, तिरुपती इंक्लिव्ह फ्लॅट नंबर एक, धानोरी )यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आकाश रंजन कदम (वय 24, रा. शनी मंदिराजवळ संत तुकाराम मंदिर जवळ, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश कदम यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक (एम एच 14, जे क्यू/ 4108 )ही भरधाव वेगाने, अविचाराने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून चालवून स्वतःहून दुचाकी डिव्हायडरला धडकवली. दुचाकीवर त्याच्या पाठीमागे बसलेला फिर्यादी यांचा मित्र अमन आयात शेख (वय 22, रा. साई मंदिर समोर, प्रज्ञा हाउसिंग सोसायटी, वल्लभनगर यास गंभीर जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ढगे हे तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

जावयाला मारहाण;पत्नीसह,सासू, मेव्हण्यावर गुन्हा दाखल!
पिंपरी : घरासमोर सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करून घरी जाऊन भांडण करण्याचा सल्ला दिल्याच्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुण्याने जावयाला मारहाण केली. ही घटना शनिवार 30 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी सचिन अरुण देवकाते (वय 38 ,रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप महानवर (वय 22, त्यांची आई, वय 45) आणि सचिन यांची पत्नी (वय 30) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या घरासमोर त्यांची सासू एका महिलेसोबत वाद घालत होती. यावेळी सचिन देवकाते यांनी त्यांना घरी जाऊन भांडण करण्याचा सल्ला दिला. या कारणावरून जावयाला मारहाण करून जावयाला मारहाण; पत्नी सह सासू, मेव्हण्यावर गुन्हा जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"