Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
पिंपरी-चिंचवड

सेवा संकल्प अभियानांतर्गत महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन!

सेवा संकल्प अभियानांतर्गत महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन!

सामाजिक बांधिलकी जपत १९६ नागरिकांनी केले रक्तदान
पिंपरी : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण १९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले, यामध्ये १५ महिलांचाही समावेश आहे. तसेच या शिबिरांदरम्यान सामूहिक रक्तदानाची शपथ घेण्यात आली.

viara vcc
viara vcc

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानांतर्गत पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय, स्व. इंदिरा गांधी रुग्णालय, सांगवी, नवीन थेरगाव रुग्णालय आणि आकुर्डी येथील ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

indra dairy
indra dairy

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिजामाता रुग्णालयातील डॉ. अल्वी आणि डॉ. शीतल शिंदे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सांगळे आणि नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, नवीन थेरगाव रुग्णालयातील डॉ. संजय सोनेकर आणि डॉ. शंकर मोसलगी तसेच आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर आणि डॉ. हरीश शेंडे यांनी या शिबिरांच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सर्व शिबिरांसाठी वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. नीता घाडगे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गणेश लोंढे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

“रक्तदान हे मानवतेची सेवा करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा.” – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"