Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

सावत्र नातवाने मालमत्तेच्या वादातून केला आजीचा खून!

सावत्र नातवाने मालमत्तेच्या वादातून केला आजीचा खून!

पिंपरी : मालमत्तेत हिस्सा देत नसल्याच्या रागातून सावत्र नातवाने आजीवर चाकूने वार करून आजीचा खून केल्याचा प्रकार नवी सांगवीत घडला आहे. त्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची माहिती दिली. शुक्रवार नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास क्रांती चौकातील शिंगोरे बिल्डिंगमध्ये ही घटना घडली.

viara vcc
viara vcc

मंगल बाबुराव शिंगोरे (वय 60, क्रांती चौक, नवी सांगवी) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. 38 वर्षीय त्यांच्या मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावत्र नातू ओंकार किसान शिंगोरे (वय 26, रा. पिंपळे गुरव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी ओंकार याच्यावर यापूर्वी खून आणि खूनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओंकार हा मंगल शिंगोरे यांच्या सावत्र मुलाचा मुलगा आहे. तो पिंपळे गुरव येथे वास्तव्यास होता. मंगल या त्यांच्या मालमत्तेतील हिस्सा ओंकारला देत नसल्याने त्यांच्यात वाद होत होता. याच कारणावरून ओंकारच्या मनात आजी विषयी राग होता. शुक्रवारी सकाळी मंगल या घरी असताना ओंकार तेथे आला मालमत्तेतील हिस्सा देत नसल्याच्या कारणावरून त्याने आजीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात मंगल यांचा मृत्यू झाला. खूनासाठी वापरलेला चाकू आरोपीने दोन तीन महिन्यापूर्वी ऑनलाइन मागवलेल्या चाकूंच्या सेटमधील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने शेट मधील एक चाकू वापरून आजीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"