Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

4th October 2026
पिंपरी-चिंचवड

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य : रामदास आठवले

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य : रामदास आठवले

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा नागरी सत्कार संपन्न
पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारणे, तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे वाढवून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची निवड योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

viara vcc
viara vcc

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी येथे करण्यात आला आहे.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट, आमदार महेशदादा लांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे, भंते राहुल बोधी, पीपल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रशेखर कांबळे, नागसेन कांबळे, माजी महापौर योगेश बहल, मंगलाताई कदम, संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, नगरसेवक राहुल भोसले, परशुराम वाडेकर, सिद्धार्थ बनसोडे तसेच प्रिया अण्णासाहेब बनसोडे, सुनील मगरे, संयोजक व सत्कार समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ, राहुल सोनवणे आदींसह हजारो बंधू भगिनी उपस्थित होते.

indra dairy
indra dairy

यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले की, अण्णा बनसोडे हे शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेतृत्व आहे. अण्णा बनसोडे, मंत्री संजय शिरसाठ, मी स्वतः निवडणुकीत जिंकून आलो आणि हरलो देखील. बनसोडे ३ वेळा निवडून आले, शिरसाट ४ वेळा निवडून आले, मी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सलग ३ वेळा मंत्री आहे . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे ध्येय ठेवून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन ही संस्था वाढवली. अण्णा बनसोडे आणि मी देखील सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ असे रामदास आठवले यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मी कधीतरी आमदार होईल विधान भवनात जाईल हे स्वप्नातही येत नव्हते परंतु, रामदास आठवले, अण्णा बनसोडे यांच्यासह मला मंत्री आणि विधानभवनात तालिका अध्यक्ष होण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाली. अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा देताना शिरसाठ पुढे म्हणाले की, या संस्थेत तुम्ही चांगले काम करा, सरकारचा मंत्री म्हणून या संस्थेला आवश्यक निधी देण्याची जबाबदारी मी घेतो.

सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब बनसोडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय अजित दादा पवार यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या माझ्या सत्कार समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले देशाचे केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आमचे सहकारी संजयराव शिरसाट, विधिमंडळातील माझे सहकारी , एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त , पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश बहल आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आजी, माजी नगरसेवक नगरसेविका आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माझे सर्व सहकारी, सत्कार समितीचे सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड व त्यांचे सहकारी, पिंपरी चिंचवड शहरातील आरपीआयचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकार्यांना मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो.

आज हा आनंदाचा क्षण आहे. आपण दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरणार नाही. हा केवळ माझा वैयक्तिक सत्कार नसून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. सोसायटीचे विश्वस्त यांनी केलेली माझी निवड ही माझ्यासाठी निश्चित अभिमानाची बाब आहे. मात्र हे पद माझ्यासाठी सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी देणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले साहेब आणि सर्व सन्माननीय विश्वस्त मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. १९४५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सोसायटीचा इतिहास म्हणजे आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले त्यामुळे या महान विचारांच्या वारसाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे.

माझ्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित, गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समान संधी मिळाली पाहिजे. आजच्या बदलत्या काळात पारंपरिक शिक्षण सोबत उच्च तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण, संशोधन, विकास, कौशल्य आणि रोजगार मिळवून देणारे शिक्षण यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आपल्या संस्थेतील विद्यार्थी केवळ देशातच नव्हे तर त्यांचा जागतिक स्तरावर नावलौकिक पोहोचला पाहिजे. यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. संस्था ही एका व्यक्तीमुळे मोठी होत नाही. विश्वस्त, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी पालक आणि समाज यांच्या सामूहिक प्रयत्नातून संस्था घडते त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता प्रतिष्ठा अधिक उंचावण्याचं काम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी ऋण व्यक्त करताना सांगितले.

आमदार महेशदादा लांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे यांनी देखील अण्णा बनसोडे यांच्या गौरवार्थ भाषण केले व शुभेच्छा दिल्या. स्वागत सुरेश निकाळजे, सूत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार अंजना गायकवाड यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"