फक्त मुद्द्याचं!

1st June 2026
पिंपरी-चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम!

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी आर्थिक स्वरुपात आगाऊ रक्कम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी १५ हजार रुपये सण अग्रिम दिला जाणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात आगाऊ रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये अग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सणासाठी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा हा निर्णय महत्त्वाचा समजला जातो.

सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी किंवा सातव्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी असणाऱ्या पात्र सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरुपात या सण अग्रिमचा लाभ मिळणार आहे. सण अग्रिम म्हणून दिली जाणारी १५ हजार रुपयांची रक्कम सदर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांप्रमाणे १० हप्त्यांमध्ये परतफेड केली जाणार आहे. ही सण अग्रिमाची रक्कम १४ एप्रिल २०२६ पूर्वी अदा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"