फक्त मुद्द्याचं!

29th April 2026
गुन्हेगारी

पाठीवर तलवार लटकवून फिरत असलेल्या तरुणाला अटक!

पाठीवर तलवार लटकवून फिरत असलेल्या तरुणाला अटक!

पिंपरी. : मोशी गावच्या हद्दीत 90 फुटी रस्त्यावर खडीमशीन कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला अवैधरित्या शर्टाच्या आत मध्ये लोखंडी तलवार लावून फिरत असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार 28 एप्रिल रोजी साडे चार वाजण्याच्या सुमारास मोशी गावच्या हद्दीत खडीमशीन कडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

नितीन आप्पा खेसे पोलीस शिपाई, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ऋषिकेश पांडुरंग वानखेडे (वय 19, रा. शिवाजीवाडी, मोशी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वानखेडे याने मोशी गावचे हद्दीत 90 फुटी रोडने खडीमशीन कडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या कमरेला पाठीवर शर्टाच्या आत एक लोखंडी तलवार लावून फिरत असल्याने आरोपीला अटक करण्यात आली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले तपास करत आहेत. पाठीवर तलवार लटकवून फिरत असलेल्या तरुणाला अटक

viara vcc
viara vcc

देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगल्याने तरुणाला अटक!
पिंपरी : आदेशाचा भंग करून 52 हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी व देशी बनावटीचे पिस्टलदोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याने एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 27 एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास निघोजे महिंद्रा रोड, महिंद्रा गोडाऊन शेजारी, ता. खेड येथे घडली.

या प्रकरणी गणेश पंढरीनाथ सावंत पोलीस शिपाई, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, पुणे शाखा पिंपरी यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतीक उमेश बोचरे वय 21, रा. लक्ष्मी सोसायटी, फ्लॅट नंबर 214, मेदनकरवाडी, चाकण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्र बाळगणे बाबत प्रतिबंध असताना या आदेशाचा भंग करून आरोपीने स्वतःजवळ 52 हजार रुपये किंमतीचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याने पोलीसांनी अटक केली. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गाडीलकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"