फक्त मुद्द्याचं!

29th April 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याने अटक!

तडीपार आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याने अटक!

पिंपरी : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने जवळ एक पिस्टल बाळगल्याने एका गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दारुंबरे गावचे हद्दीत, दारूंबरे ते चांदखेड रोडवर, लोहार वस्ती येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

रितेश माणिक कोळी वय 39, पोलीस हवालदार, शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .अनंता उर्फ ओंकार संताजी सोरटे वय 22 लोहार वस्ती, दारूंबरे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीस पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड परिमंडळ दोन यांनी ही कारवाई केली आहे. तडीपारीच्या आदेशाचा भंग करून आरोपीने कोणतीही परवानगी न घेता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत फिरत होता. त्याने बेकायदा बिगर परवाना भविष्यात कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने 25 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तोल व 3100 किमतीचे काडतूस असा एकूण 28 हजार 100 रुपयाचे घातक शस्त्र जवळ बाळगल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार कोळी हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"