कुस्ती परंपरेचा पाईक

- विकी बनकर, महाराष्ट्र केसरी
कुस्तीला जीव की प्राण समजणारे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आमदार महेश लांडगे यांच्यावर प्रत्येक मल्लाचे जीवापाड प्रेम आहे. कुस्तीसाठी महेशदादांचे योगदान आभाळाएवढे आहे. त्याची सर कोणालाही नाही. हे सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुलून येते. झंझावाती कुस्तीसाठी प्रसिद्ध, मुलतानी डावाचे वारसदार महाराष्ट्र श्री
आणि महाराष्ट्र केसरी
असे दोन बहुमान मिळविलेले विकी बनकर हेदेखील त्याला अपवाद नाहीत.
राज्यातील कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे बनकर पितापुत्र हे दुसरे उदाहरण होय. महाराष्ट्र केसरी दादू चौगुले (१९७१) आणि हिरामण बनकर (१९७६) यांनी सर्वोच्च किताब मिळवून कुस्तीच्या मैदानावर इतिहास घडवला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र अनुक्रमे विनोद चौगुले (२०००) आणि विकी बनकर (२००९) यांनी तोच बहुमान मिळवून घराण्याचा वारसा सुवर्णाक्षरांनी नोंदविला. पिढ्यान् पिढ्या मर्दानी खेळाला सर्वस्व मानणारे मल्ल अजूनही महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहेत, हेच या घराण्यांनी दाखवून दिले आहे. अत्यंत विनम्र, शांत आणि संयमी वृत्तीच्या विकीला महेशदादा म्हणजे कुस्तीची आन, बान आणि शान असल्याचे वाटते.

ते म्हणतात, कार्यसम्राट आमदार महेशदादा यांच्यासोबतचा स्नेह आमचा घरचाच आहे. कारण माझी सासरवाडी भोसरीतील लोंढे घराण्यातील आहे. मुळात माझ्या विवाहाचे बंध दादांचे लहान बंधू कार्तिक, सचिनभाऊ बोराटे आणि सागरभाऊ हिंगणे यांच्यामुळे जुळले आहेत. त्यांच्या मध्यस्थीमुळे लोंढे-बनकर सोयरीक घडली आहे. त्यामुळे महेशदादा माझ्या कुटुंबातीलच घटक आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच व कुस्तीगीर परिषदेचे माजी सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, वडील किसनराव लांडगे बिनीचे शिलेदार आणि लाल मातीवर जिवापाड प्रेम करणारे महेशदादा यांचे कुस्तीशी नाते श्वासाइतकेच महत्त्वपूर्ण आहे. त्याची झलक २०१३ मध्ये भोसरी येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होय. अतिशय भव्यदिव्य आणि देखण्या नियोजनामुळे ही स्पर्धा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात अग्रेसर ठरली. त्याचा आदर्श अनेक संयोजकांनी घेतला आहे. नामांकित मल्ल नरसिंग यादव याने भोसरीचे मैदान मारून ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला खेळाडू असा नवा इतिहास घडविला. त्याच्यासह आमच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे महेशदादांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाची झलक होती, असे बनकर यांनी स्पष्ट केले.
बीडच्या सईद चाऊसला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी गदेवर नाव कोरणारे विकी बनकर यांनी कुस्ती क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला तन, मन आणि धनाने मदत करणाऱ्या महेशदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मैदानावरील डाव असो, अंगावरील अपमानाचा घाव असो किंवा पहिलवानासाठी सोन्याचा भाव असो महाराष्ट्राचा हा सिंह आमच्यासाठी सर्वप्रथम धावून येतो, असे बनकर यांनी आवर्जून नमूद केले.
भोसरीतील युवा नगरसेवक, स्थायी समितीचे कणखर अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे कुशल संघटक शहराध्यक्ष, दमदार व दिलदार आमदार अशी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. लोकांच्या सेवेसाठी ते नेहमी तत्त्पर असतात. सामाजिक उपक्रमाचे ते उत्तम संयोजक असतात. त्यामुळेच ते नागरिकांना मायबाप वाटतात. भारदार आणि तडफदार नेतृत्वामुळे ते नेहमीच चर्चेत असतात, असे बनकर यांना वाटते.
कामाविषयी तत्परता, मदतीसाठी आतुरता, न्यायासाठी कठोरता आणि नागरिकांविषयी आत्मियता या सर्व बाबी त्यांच्या लोकसेवा वृत्तीला समर्पक वाटतात. त्यामुळे कोणी काहीही म्हणो राजकीय मैदानावर हा लोकप्रिय नेता हॅटट्रिक करून ट्रिपल आमदार होणारच. शिवाय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या रत्नहारातील कोहिनूर हिरा व्हावा. आमच्या मनातील जनसम्राट व्हावा, अशा शुभेच्छा बनकर यांनी व्यक्त केल्या आहेत.