फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड व भोसरीत शिवसैनिकांनी फडकावलं बंडाचं निशाण

पिंपरी-चिंचवड व भोसरीत शिवसैनिकांनी फडकावलं बंडाचं निशाण

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
पिंपरी : पिंपरी ,चिंचवड,भोसरी विधानसभेच्या तीनही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याल्या आल्या आहेत. यापैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी सुलक्षणा शीलवंत ,चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे व भोसरीमधून अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाकडे गेल्यामुळे पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघांमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले आहेत आणि त्यांनी बंडाचं निशाण देखील फडकावलं आहे. तिन्ही मतदारसंघांमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज एक महत्त्वाची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसैनिकांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले, पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. तिन्ही उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आमचं म्हणणे एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार नाही.

सचिन भोसले यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही महाविकास आघाडीविरोधात, प्रामुख्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात एवढी आक्रमक भूमिका का घेत आहात? त्यावर भोसले म्हणाले, आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्ही आमचं गाऱ्हाणं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलं. उद्धव ठाकरे यांनी आमचे मुद्दे ऐकून घेतले व म्हणाले, ‘हा विषय आम्ही चर्चेला घेऊ’.

शिवसैनिक प्रचार न करण्यावर ठाम
सचिन भोसले म्हणाले, आम्ही इतकी वर्षे पक्षासाठी काम करत आहोत. आमच्यातील एखाद्याला उमेदवारी मिळावी अशी निष्ठावंतांची अपेक्षा आहे. याबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. आम्ही परत एकदा त्यांना विनंती करणार आहोत. तरी शेवटची एकच गोष्ट सांगतो या तिन्ही मतदारसंघांबाबत जो काही निर्णय झाला आहे तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकही पदाधिकारी पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवारांचा प्रचार करणार नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्या भावना ऐकून घेतल्या जात नाहीत, तोवर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"