फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

सलमान खानच्या वडिलांना पुन्हा धमकी

सलमान खानच्या वडिलांना पुन्हा धमकी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बॉलिवुडचा अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या अजूनही सुरूच आहेत. सलमानचे वडील सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी घरासमोर बँडस्टँड परिसरात गेले असता एका बुरखाधारी महिलेनं दुचाकीवरून येऊन लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का, (लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?) असे म्हणत धमकी दिल्याची घटना घडली आहे.

यापूर्वीही अनेकदा सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या वांद्रे बँडस्टँड येथील गॅलॅक्सी अपार्टमेंट या घरावरही गोळीबार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा सलीम खान यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एका बुरखाधारी अज्ञात महिलेनं सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी दिल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून माहितीनुसार सलमान खानचे वडील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात आले होते. याच वेळी एक बुरखाधारी महिला दुचाकी स्कूटीवर आली. ती सलीम यांच्याजवळ गेली आणि म्हणाली की,लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का? (लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?). या धमकीनंतर सलीम यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आहे. वांद्रे पोलिसांनी या धमकीची दखल घेत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलीम खान यांनी माहीती दिल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुरखाधारी महिला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी बँडस्टँड परिसरातच सलीम खान यांना धमकीचं पत्र आलं होतं.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"