Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पुणे

पुण्यातून २ दिवस खासगी उड्डाणाला मनाई

पुण्यातून २ दिवस खासगी उड्डाणाला मनाई

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे.

अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते २७ सप्टेबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"