वाकड यथील फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळीबार

पिंपरी : एकीकडे गणेश विसर्जनाच्या धामधुमीत सुरु असताना पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळीबार घटना घडली आहे.
शहरातील वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर दिशेने एकाने बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनामधून येऊन एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने केलेला गोळीबार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
फिनिक्स मॉलजवळ एक व्यक्ती चारचाकी वाहनातून उतरला. त्यानंतर फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सातच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मॉलच्या गेट समोर उभं राहून अज्ञात व्यक्ती गोळीबार करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.
मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनांमध्ये पसार झाला आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही. तरी गणपती विसर्जनाच्या दिवशी मॉलच्या गेटवर गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. वाकड पोलीस गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध युद्ध पातळीवर घेत आहेत.