Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

17th September 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सेवा संकल्प’ लोकचळवळ बनवणार” : महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सेवा संकल्प’ लोकचळवळ बनवणार” : महापौर रवि लांडगे

महापौरांच्या पुढाकारातून ‘सेवा संकल्पा’चा दिवा; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साक्षीने जनसेवेचा संकल्प
पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी बंधू-भगिनींसमवेत ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित करून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करत पिंपरी-चिंचवड शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

viara vcc
viara vcc

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे देशसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याच सेवाभावाला केंद्रस्थानी ठेवून महापौर रवि लांडगे यांनी शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि नागरिककेंद्री बनविण्यासाठी प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रम राबविला.

indra dairy
indra dairy

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शिक्षण समिती सभापती रविना अंघोळकर, महिला व बालकल्याण सभापती राणी पठारे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मधुकर बच्चे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा’ ही केवळ संकल्पना न ठेवता ती सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी आणली आहे. विकासाभिमुख प्रशासन, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आणि देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची भूमिका आम्हाला प्रेरणा देते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या सेवाभावातून प्रेरणा घेऊन आपल्या शहरासाठी एखादा सकारात्मक संकल्प करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल,” असे महापौर रवि लांडगे यांनी यावेळी सांगितले.

शहराच्या स्वच्छतेसाठी ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता दररोज काम करणारे सफाई कर्मचारी हे शहराच्या सेवाव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करताना त्यांनाच या उपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. त्यांच्या समवेत प्रज्वलित करण्यात आलेला ‘संकल्पाचा दिवा’ हा केवळ पंतप्रधानांना दिलेल्या शुभेच्छांचे प्रतीक नसून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि संवेदनशील जनसेवेसाठी संपूर्ण शहराने एकत्र येण्याच्या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.‘सेवा संकल्प अभियान’ केवळ एका दिवसापुरते मर्यादित राहणार नसून ते शहराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असा निर्धार महापौर यांनी व्यक्त केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"