Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

18th September 2026
गुन्हेगारी

कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक!

कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक!

पिंपरी : चिकन सेंटरवर येणाऱ्या ग्राहकांसह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आडून ‘आम्ही इथले भाई आहोत’ मध्ये आला तर याद राखा अशी धमकी देत हातातील धारदार कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. निघोजे गावातील बारामती ॲग्रो चिकन सेंटर परिसरात मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमृत नेवाळे यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार राजकुमार डोंगरे (वय 23, आल्हाट वस्ती, निघोजे, ता. खेड), समाधान विजय ढाकणे (वय 22, रा. थिगळे वस्ती, निघोजे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निघोजे गावातील आजी- आजोबा केंद्राजवळ आरोपी हातात धारदार कोयता घेऊन हवेत फिरवत होते. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून शिवीगाळ करत त्यांनी दुकानातील ग्राहकांनाही धमकावले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना अटक केली. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

महिला वाहतूक पोलिसांला शिवीगाळ!
पिंपरी : भरधाव वेगाने दुचाकी चालवत रॉंग साईडने आलेल्या आई मुलाला महिला वाहतूक पोलिसांनी विचारणा केल्याने त्याचा राग आल्याने दोघांनी महिला पोलिसाला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना आळंदीतील देहु फाटा चौकात बुधवार 16 सप्टेंबर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई पूनम तापकीर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस रवींद्र ताम्हाणे (वय 19) आणि सुजाता रवींद्र ताम्हाणे (दोघेही रा. ज्ञानराज कॉलनी, चरवली बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तापकीर या दिघी आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस असून देहू फाटा चौकात कर्तव्यावर होत्या. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून विरुद्ध दिशेने वेगात आले. तापकीर यांनी त्यांना अडवून वाहतूक नियम मोडल्याबद्दल विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी तापकीर यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"